अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात अलिबाग पोलिस स्टेशन हद्दीतील अलिबाग, थळ,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात…याकरिता पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग उप विभागीय अधिकारी विनीत चौधरी, अलिबाग पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या उपस्थितीत रूट मार्च काढण्यात आला…तीस दिवसावर आलेल्या लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघात बुधवारी पोलिसांनी रुट मार्च आणि पथसंचलन केले…जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रूट मार्च व पथसंचलन करण्यात आले…यावेळी स्वतः चालत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,उपविभागीय पोलीस अधिकारी विनिता चौधरी,अलिबाग पोलिस निरीक्षक किशोर साळे या पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते.
विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सायंकाळी अलिबाग विधानसभा मतदारसंघात अलिबाग शहरातील बालाजी नाकापासून सुरुवात झाली…हा रुटमार्च पोस्ट ऑफिस ऑफीस, पापाभाई पठाण चौक, बाजारपेठ, जामा मशीद, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ठिकरुळ नाका, शेतकरी भवन, रिक्षा स्टँड , अलिबाग एस टी स्टँड महाविर चौक, मारूती नाका, आयबीआय बँक कार्यालय असा घेण्यात आला…तसेच थळ ग्रामपंचायत हद्दीत रुट मार्च घेण्यात आला…
यासाठी 15 अधिकारी आणि 100 कर्मचारी, एस.ए.पी त्रिपुरा प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, होमगार्ड हजर होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासन सज्ज आहे…सर्व जनतेला व्यवस्थितरित्या मतदान करता यावे, भयमुक्त वातावरणात, शांततेत आणि सुरळीत ही निवडणूक पार पडावी यासाठी बुधवारी अलिबाग शहरामध्ये पोलिस रूट मार्च आणि पोलीस संचलन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली…