उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून उरण विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे…त्यातूनच आता उरणमध्ये १००% सामाजिक कार्य करणाऱ्या श्रीकन्या तेजस डाकी नावाचे वादळ घोंगावत आहे… रविवार दि.२० ऑक्टोबर रोजी उरण तालुक्यातील बोरखार गावात हजारो लोकांच्या उपस्थितीत जनसंवाद सभा संपन्न झाली… या सभेला पत्रकार शिरोमणी कांतीलाल कडू यांनी जहाल असे मार्गदर्शन केले… त्यांच्या मार्गदर्शनात पत्रकारांना ब्रेकिंग न्यूज सापडली… ही ब्रेकिंग न्यूज म्हणजे बोरखार दशक्रोशीसह उरण तालुक्यात १०० % समाजकारण करणारे तेजस कैलास डाकी या तरुणाचा राजकारणात उतरण्याचा मनोदय जाहीर झाला… कांतीलाल कडूंच्या तोंडून तेजस डाकी यांच्या राजकीय रणांगणाची घोषणा झाल्यानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊन लोकांनी याला साथ दिली…१०० % समाजकारण करणारे तेजस डाकी राजकारणात उतरले आहेत… त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीकन्या तेजस डाकी उरण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत… कांतीलाल कडू यांनी ही राजकीय घोषणा केली… तेजस डाकी हे समाजकारणात जसे यशस्वी झाले तसे ते राजकरणातही यशस्वी होतील.. असा विश्वास कांतीलाल कडू यांनी व्यक्त केला…त्याचबरोबर आपल्या लाडक्या बहिणीला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन जनसमुदायाला कांतीलाल कडू यांनी केले… त्याआधी कांतीलाल कडू आणि तेजस डाकी यांनी आपल्या भाषणात अविकसित राहिलेल्या उरण विधानसभा मतदार संघावर भाष्य केले… या अविकसितपणाला सध्याचे विद्यमान आमदार आणि यापूर्वीचे सर्व राजकीय नेते जबाबदार असल्याचा घणाघात केला.. तर नवनिर्वाचित अपक्ष उमेदवार श्रीकन्या तेजस डाकी यांनी निवडून आल्यानंतर उरण तालुक्याचा विकास करण्याचे जाहीर करताना महिलांसाठी भरीव काम केले जाईल… असे स्पष्ट केले.. दरम्यान जनसंवाद सभेला लोकांची मोठी गर्दी होती… विचापीठावर पत्रकार शिरोमणी कांतीलाल कडू यांच्यासह अपक्ष उमेदवार श्रीकन्या तेजस डाकी,माजी सरपंच कैलास डाकी,सामाजिक कार्यकर्ते मनोहर म्हात्रे व तेजस डाकी यांचे समर्थक तरुण कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..