रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव) :-
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत…ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शेकापला धक्का बसला आहे…चनेरा विभागातील वांदरखोंडा गावाने आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे…जसजशा निवडणुका जवळ येत आहे..तसतसे महेंद्र दळवींचा करिष्मा अलिबाग मुरुड मतदारसंघात पहावयास मिळत आहे..सर्वसामान्यांचे आमदार म्हणून उपाधी असलेले महेंद्रशेठ दळवींच्या पक्षात आज शेकडोनी प्रवेश होत आहेत…वांदरखोंडा गावाने एकमुख शिंदे गटात प्रवेश केल्याने महेंद्र दळवी तुम्ही आमदार काय मंत्रीच व्हाल असा शब्द ग्रामस्थांनी दिला… अलिबाग मतदारसंघात कधी नव्हे तर एवढा विकास महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून होत असल्याने त्यांच्या शिवसेनेत बहुसंख्य गाव प्रवेश करीत आहेत…यावेळी रोहा तालुकाप्रमुख मनोज कुमार शिंदे व रोहा शहरप्रमुख मंगेश रावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते…