उरण शिवसत्ता टाइम्स ( वार्ताहर ) :-
शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचे आम्ही पाईक असून त्यांनी आम्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्यांचे एक दिलाने काम करावे.त्यामुळे आम्ही शेकापचे कार्यकर्ते माजी आमदार विवेक पाटील यांच्या आदेशाचे पालन म्हणून महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मत शेकापचे नेते राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची भूमिका काय राहणार आहे.त्या पार्श्वभूमीवर शेकापचे नेते राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली वहाल येथील शेकापच्या कार्यालयात सोमवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाची भूमिका काय राहणार आहे.या संदर्भात राजेंद्र पाटील हे माहिती देताना बोलत होते.यावेळी माजी सरपंच प्रशांत पाटील,शेकाप गव्हाण विभाग जि.प.मतदार संघ अध्यक्ष दिपक तांडेल,माजी सरपंच गणेश पाटील सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजेंद्र पाटील यांनी पुढे सांगितले की प्रितम म्हात्रे यांनी १९० उरण विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी ही स्वघोषित केली आहे.त्यामुळे त्यांना आमचा विरोध नाही.मात्र आमच्या पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी आम्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले आहे की आपण यापुढे एक दिलाने आघाडीचा धर्म पाळत महाविकास आघाडी जो उमेदवार उभा करणार त्याचे एक दिलाने काम करावे.उरण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने प्रितम म्हात्रे यांना उमेदवारी दिली तरी आम्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माजी आमदार विवेक पाटील यांच्या आदेशाचे पालन करणार असल्याचा विश्वास ही शेवटी राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे…