महाड शिवसत्ता टाइम्स ( रेश्मा माने ) :-
महाड तालुक्यातील भावे आदिवासी वाडीतील एका आदिवासी महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी पीडित महिला ही डोंगराळ भागात बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. आरोपीने याच संधीचा फायदा घेऊन महिलेचा पाठलाग केला…तसेच पीडित महिलेची साडी ओढून अतिप्रसंग करून महिलेच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न केली. याबाबत आरोपी सिताराम कोंडीबा सुतार वय वर्ष 59 राहणार भावे यांच्या विरोधात विनयभंग व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे… आरोपी सिताराम सुतार याला पोलिसांनी अटक केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत…