अल्काईल अमाईन्स केमिकल्स कंपनी तर्फे माझी शाळा स्वच्छ शाळा उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…

0
127

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-

सालाबाद प्रमाणे यंदाही पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील नामवंत असलेल्या अल्काईल अमाईन्स केमिकल्स कंपनीच्या सी.एस.आर. फंडामार्फत ‘माझी शाळा स्वच्छ शाळा’ उपक्रम नुकताच राबविण्यात आला… रसायनी पंचक्रोशीतील जिल्हा परिषदेच्या २३ शाळेतील जवळपास २००० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते… या उपक्रमात चित्र रंगविणे, घोषवाक्य, प्रश्नमंजुषा, उत्कृष्ट वर्ग अशा अनेक स्पर्धा यावर्षी घेण्यात आल्या… या स्पर्धांमध्ये एकूण जवळपास १२५० आकर्षक पारितोषिके देण्यात आली… स्वच्छतेचं महत्त्व आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या दृष्टीने या स्पर्धा दर वर्षी घेण्यात येतात… सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्या विशेष सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असल्याची माहिती आयोजकांनी दिली… परिसरातील जि.प.शाळांमध्ये नुकताच हा उपक्रम पार पडल्याने या उपक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले…