म्हसळा शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर):-
सन २०२१ पासून आंबेत पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता…दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला…मात्र काही महिन्यातच या पुलाचा बीम क्रमांक दोन कमकुवत झाल्याचे समजले आणि पुन्हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला…सदर दुरुस्तीच्या कामासाठी कोणतीही कंपनी काम करण्यास तयार झाली नाही…अशा कठीण परिस्थितीत पिलानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेड या कंपनीद्वारे कामाचा शुभारंभ झाला… मोठे आवाहन स्वीकारून या कंपनीने हे जोखीम हातात घेवून काम पूर्णत्वास नेले आणी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाश्यांचा महत्वाचा मार्ग सुखकर केला…मात्र या पुलाच्या कामाच्या ठेकेदाराची चिंता वाढली आहे..या कंपनीने केलेल्या कामाचे बिल अद्याप अपुऱ्या स्वरूपता असल्याने ही कंपनी आता चिंतेत सापडली आहे…महाराष्ट्र शासनाने गेल्या अडीच ते तीन वर्षात कोट्यावधी रुपयांच्या योजना राबविल्या मात्र सरकार ला जीवाशी खेळत असलेल्या आंबेत सावित्री खाडीवरील आंबेत पुलाच्या कामात संबंधित कंपनीला त्यांच्या कामाचा मोबदला द्यायला विलंब का होतोय असा सवाल या कंपनीचे व्यवस्थापक करत आहेत…