माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
स्व. मधूशेठ ठाकुरांचे रायगडात काँग्रेस वाढविण्यामागे मोठे योगदान आहे… आता त्यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर वडिलांचा वारसा घेऊन श्रीवर्धनच्या मैदानात उतरत आहेत… १९३ श्रीवर्धन विधानसभा संघातून काँग्रेस पक्ष चाचपणी करत आहे… यासाठी नुकतीच पक्षाची बैठक माणगाव येथे लावण्यात आली होती… या बैठकीला लोकसभा निवडणुकीत दक्षिण रायगड जिल्ह्यासाठी इंडिया आघाडीचे निरिक्षक म्हणून काम केलेल्या राजाभाऊ ठाकुर यांना पाचारण करण्यात आले होते… दक्षिण रायगड काँग्रेसच्या खास निमंत्रणावरून राजाभाऊ ठाकूर बैठकीला उपस्थित होते…. यावेळी पाच तालुक्यातील काँग्रेस अध्यक्षांनी श्रीवर्धनचे अध्यक्ष सादिक राऊत, म्हसळ्याचे मोयिझ शेख, माणगावचे विलास सुर्वे, तळाचे शरद भोसले, रोह्याचे सुनिल देशमुख…. यांनी राजाभाऊंना श्रीवर्धनमधून विधानसभा निवडणूक लढण्याची विनंती केली…. राजाभाऊ यांच्या मागे ५ तालुकाध्यक्षांची वज्रमूठ उभी राहिल्याने राजाभाऊंनी निवडणूक लढण्याचे मान्य केले… यावेळी त्यांनी कठीण काळात पक्ष टिकवून ठेवणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले… तसेच आपल्या वडिलांबाबत गौरवोदगार काढले… माझे वडील हेच माझे राजकीय गुरू असल्याचे राजाभाऊ म्हणाले… काँग्रेस पक्षाने ए बी फॉर्म दिल्यास नक्कीच मी निवडणूक लढवेन… असे पुढे स्पष्ट केले… या बैठकीला मुस्तूला बुरुड, नईम कादिरी, अबरार काळोखे, शब्बीर फकीर, सुफियाने हळदे, सौ. नजीमा रिजवान मुकादम, रिजवान मुकादम, सदानंद मोरे, महेश जाधव, रमेश कचरे, एजाज घरटकर, इम्तियाज कोकाटे, फारुख परकार, शेख बुरुड, जि. के. गमरे, फझल घणसार, शौकत राऊत, तसलिम बुरुड,शरीफ सरखोत, आदम बगदादी, सैजाद अन्सारी, संदीप सकपाळ, श्री, राऊत, नदिर फकीर, सौ,अनिता महाडिक यांच्यासह निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….