Friday, November 22, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडपरिवर्तन गावठाण विकास लढवणारी संघटना...गावठाण विकास सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन...

परिवर्तन गावठाण विकास लढवणारी संघटना…गावठाण विकास सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन…

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात साजरा करण्यात आला…त्याचे औचित्य साधून नैना क्षेत्रातील गावांचे सीमांकन करून गावठाण विस्तार व नैना टीपी स्कीम याबाबत अॅड. प्रल्हाद कचरे व अॅड. के. टी. खांडेकर यांच्याबरोबर संवाद साधण्याचा विचारमंच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी नैना प्रकल्पाबाबत प्रत्येकांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शेतकऱ्यांवर अन्याय होऊन हा प्रकल्प होऊ देणार नाही. टीआयपीएलला जरी कामाचा ठेका मिळाला असला तरी मी तुम्हाला आश्वस्त करतो की शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत कोणाही ठेकेदारला इथे एकही वीट लावू देणार नाही, असे स्पष्ट केले. तुमचे समाधान होईपर्यंत आम्ही रस्त्यावर तुमच्यासोबत थांबू, नैनाच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या गोष्टी नसल्या तर नैना हवी की नैनाच नको, ग्रामस्थांना हा प्रोजेक्ट हवा की नको याबाबत त्या गावात ग्रामसभा घेऊन तसा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले…आपण कोणाची घरे पाडण्यासाठी हे पत्र दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले… सिडकोच्या अधिकाऱ्यांना एक पाऊल टाकू न देण्याची काळजी आपण घेऊ, कारण ही आपली जमीन आहे. आमच्या जागेत सिडको नियोजन करू शकत नाही हे सर्वांनी एकमुखाने म्हटले पाहिजे, असे नमूद करून गावांचे सीमांकन करून गावठाण विस्तार करण्याबाबत किरण पाटील यांनी चळवळ उभी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमास माजी आमदार बाळाराम पाटील, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील, वामन शेळके, किसन नेरूळकर यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments