अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पेण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा मोठी चुरशीची होताना पहावयास मिळतेय. राज्यात भाजप आणि शिंदे शिवसेनेची महायुती असली तरी पेण विधानसभा मतदारसंघात चित्र काही वेगळेच आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपचे माजी आमदार रवींद्र पाटील यांना शिवसेना शिंदे गटाचे युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून मोठं आव्हान दिलंय. त्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जातेय… इथे महायुतीत संघर्ष पेटल्याचे चित्र आहे.अलिबागमध्ये भाजपचे दिलीप भोईर (छोटम शेठ)यांनी अपक्ष अर्ज भरल्याने पेण विधानसभेमध्ये शिवसेनेनेही उमेदवारी दिल्याचे चित्र आता उघड झालेय. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत पहावयास मिळणार आहे.