पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदिप मोकल):-
पेण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रसाद भोईर यांनी उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी प्रविण पवार यांच्याकडे सादर केला. यावेळी माजी खासदार अनंत गिते, शिवसेनेचे जिल्हासह संर्पक प्रमुख किशोर जैन, समन्वयक नरेश गांवड, समीर म्हात्रे आदी उपस्थित होते…
शिवसेनेच्या पेण येथिल कार्यालयातुन रॅली काढण्यात आली…या रॅलीमध्ये शिवसेनेचे सहसंर्पक प्रमुख किशोर जैन, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे,समन्वयक नरेश गांवड, तालुका प्रमुख जगदीश ठाकुर, समिर म्हात्रे आदि पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते…रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता…. पेण मतदार संघात चौरंगी लढत झाली तर त्यांचा फायदा प्रसाद भोईर यांना होईल. तरुण कार्यकर्ते शिवसैनिकांनी प्रसाद भोईर यांना स्विकारले आहे. त्यामुळे प्रसाद भोईर हे विजयी होणार आहेत असे माजी खासदार अनंत गिते यांनी सांगितले…
सर्वसामान्य लोकांमधे राहुन कार्य करणारा मी कार्यकर्ता आहे… या मतदार संघात बदल हवा…ही येथिल लोकांची मागणी आहे… प्रस्थापितांवर नाराजी आहे त्यामुळे माझा विजय होणार असल्याचे प्रसाद भोईर यांनी सांगितले…