उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून उरणचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी उमेदवारी लढविण्याचे आदेश दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्याकडे उरणच्या सर्वांगीण विकासासाठी ॲड. सत्यवान भगत यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दाखल केला. यावेळी सत्यवान भगत यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लोकनेते दि.बा.पाटील व हुतात्म्यांना अभिवादन केले….
मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत हे उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पत्रव्यवहार करून प्रयत्न करत आहेत. उरणचा भावी आमदार म्हणून उच्च सुशिक्षित सत्यवान भगत यांच्या नावाची चर्चा आहे… मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सत्यवान भगत यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला… यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण दळवी, मनसे जिल्हा सचिव केसरी पाटील, उरण जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी, तालुका सचिव मंगेश वाजेकर,वाहतूक मनसेचे अध्यक्ष अल्पेश कडू, तालुका उपाध्यक्ष दिपक पाटील, तालुका सचिव राकेश पाटील, तालुका उपाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे उर्फ भाई, पनवेल उपतालुका अध्यक्ष निर्दोष गोंधळी, उलवे शहर अध्यक्ष राहून पाटील,उरण शहर अध्यक्ष धनंजय भोरे जासई विभाग अध्यक्ष सोमनाथ घरत, चिरनेर विभाग अध्यक्ष बबन ठाकूर, महिला तालुका अध्यक्ष कविता म्हात्रे,मालती म्हात्रे,विजय तांडेल आदि उपस्थित होते…