महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
महाड तालुक्यातील पत्रकार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाड व मुंबई संपर्कप्रमुख दिलीप अंबावले यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने महाड व मुंबईमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पोकळी निर्माण झाली आहे…दिलीप आंबवले हे हुशार व डॅशिंग शिवसेना युवा नेतृत्व म्हणून महाड तालुक्यामध्ये व मुंबईमध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहेत…त्यांनी संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पोकळी निर्माण झाल्याचे दिसते…