पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-
छत्रपती शिवरायांच्या सुराज्यानंतर मराठेशाही अस्तित्वात न राहता पेशवाई आली….त्यावेळी मराठा सरदार मल्हारराव होळकर यांनी दुसरे मराठा सरदार दत्ताजी शिंदे यांना एक राजकीय सल्ला दिला होता… हा सल्ला इतिहासात जबरदस्त प्रसिद्ध आहे…तो सल्ला असा…नजीबखान रोहिला यास हाती धरून भागीरथीस पूल बांधून पुलापलीकडे अयोध्या,ढाका ,बंगला व काऊर देश पावेतो मोहीम करावी… हे न करीता तुम्ही नजीबखान याचे पारिपत्य कराल तर तुम्हास पेशवे धोतरे बडवावयास लावतील…जोपर्यंत राजकीय शत्रू जिवंत आहे… तोपर्यंतच आपल्याला पेशवे दरबारी किंमत आहे… एकदा शत्रू संपले… की आपलाही पेशवे घरगड्यासारखा वापर करतील… असा सल्ला मल्हाररावांनी शिंदे यांना दिला होता… सध्या भाजपचा मुख्य राजकीय शत्रू शेकाप पक्ष आहे… शेकापातील अनेक नेते फोडून भाजपवाले शेकाप कमजोर करत आहेत… शेकापमधून जे नेते भाजपात गेले आहेत… त्यांना शेकाप अस्तित्वात असेपर्यंत भाजपात किंमत आहे… एकदा शेकाप संपला की हे नेतेही संपणार आहेत… इतिहासाची पुनरावृत्ती होत असते… पूर्वीच्या काळी पेशवाई होती … सध्या आधुनिक पेशवाई आहे… राज्याचा, देशाचा कारभार आधुनिक पेशव्यांच्या हातात आहे… या पेशव्यांना शेतकरी बहुजन मराठा समाजाच्या राजकीय पक्षांची ऍलर्जी आहे… हे राजकीय पक्ष बहुजन नेतृत्व घडवीत असल्याने त्यांना ते नष्ट करायचे आहेत… प्रबोधनकार ठाकरेंची म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना व शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांनी फोडला… काँग्रेसही फोडली… आधुनिक पेशवे ज्या आर.एस.एस. ने घडविले… त्या आर.एस.एस.च्या हिटलिस्टवर राष्ट्रपिता जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेतून निर्माण झालेला शेकापक्ष आधीपासूनच आहे… आधुनिक पेशव्यांना शेकाप पूर्णपणे संपवायचा आहे… त्यामुळेच आधुनिक भाजपरुपी पेशवे शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेसबरोबर शेकापही संपवत आहेत… सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यात भाजपच्या आधुनिक पेशव्यांनी शेकापचे अनेक नेते फोडले… धैर्यशील पाटील, छोटमशेठ भोईर ही अलीकडची उदाहरणे आहेत… शेकापकडे लढाऊ नेत्यांची फौज नाही… पनवेलचा एकटा टायगर माजी आमदार विवेक पाटील जेलमध्ये आहेत… बाळाराम पाटील,प्रीतम म्हात्रे,जे.एम.म्हात्रे,राजेंद्र पाटील,काशिनाथ पाटील,उरणचे विकास नाईक,रमाकांत म्हात्रे,जासईचे सरपंच संतोष घरत,राजेश केणी,गणेश कडू यांच्या ताकदीला मर्यादा आहेत… शेकापने सद्यस्थितीतील आपली ताकद,आवाका समजून घेणे गरजेचे आहे… ही लढाई ताकदीची नसून युक्तीची आहे… शेकापचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल… अलिबागची जागा जिंकायची असेल तर जयंत पाटीलांना महाविकास आघाडीसोबत राहणे गरजेचे आहे…महाविकास आघाडी जिंकली तर शेकापच्या नशिबी अच्छे दिन आहेत… सत्ता आल्यावर विधान परिषद,स्थानिक स्वराज्य संस्था,कोकण पदवीधर,शिक्षक मतदारसंघ… शेकापला अनेक संधी आहेत…जयंत पाटील, प्रीतम म्हात्रे महाविकास आघाडीतून आर्थिक बळावर विधान परिषदेवर सहज जाऊ शकतात… त्यामुळे आता जयंत पाटीलांच्या एका निर्णयावर शेकापचे रायगड जिल्ह्यात अस्तित्व अवलंबून आहे… जयंत पाटीलांच्या महाविकास आघाडीसोबत राहण्याच्या याच निर्णयाचा शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनाही फायदा होऊ शकतो… महाविकास आघाडीच्या ७ विधानसभा जागा एकट्या जयंत पाटीलांच्या निर्णयावर निवडून येऊ शकतात… जयंत पाटील आगे बढो… पण महाविकास आघाडीला घेऊन…