रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):-
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुराज्य सामाजिक संस्था ही एक जिल्ह्यात नामांकित संस्था आहे… या संस्थेला राज्यस्तरावरसुद्धा सर्वोच्च संस्था म्हणून आतापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे… या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक तसेच शासकीय योजनेचा सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोचवली जाते… गेल्या ४ वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून दिवाळी पहाट उत्साहात साजरी केली जाते… यावर्षी या संस्थेच्या माध्यमातून रोह्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील शिवसृष्टी येथे एक दिवा शिवरायांसाठी असा आगळा वेगळा उपक्रम घेत दिवाळी पहाट दिमाखात साजरी करण्यात आली… त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे औचित्य साधून दिवाळी पहाट निम्मित रोह्यातील कलाकारांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच रिल्स स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते… रोहेकारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला… तसेच संस्थेच्या माध्यमातून रोहेकरांसाठी मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताची मैफिल सुद्धा आयोजित केली होती… या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे रोहा तालुका प्रमुख अमित घाग, रोहा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर, महेश कोलाटकर, नगरसेवक महेंद्र गुजर, स्पंदन संस्थेच्या संस्थापक स्नेहल आंब्रे, गड किल्ल्याचे दुर्गा अभ्यासक सुखदजी राणे यांनी उपस्थिती लावली… यावेळी संस्थेचे संस्थापक रोशन चाफेकर, अध्यक्ष किरण कानडे, सचिव हाजी कोठारी, तसेच सदस्य वैभव कुलकर्णी, कुणाल आमले, रिया कासार, प्रसाद पातकुले, सेजल तांबडे, परेश चितळकर विनीत वाकडे, स्वरूप नाकती, भरत ठाकरे, करण सोनवणे आदि सदस्य व रोहेकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते…