अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग समुद्र किनार्यावर शनिवार दि.२ नोव्हेंबर रोजी अलिबाग बिच शोच्या दुसर्या पर्वाला शानदार सुरुवात झाली…हा कार्यक्रम पाहण्यासाठी पर्यटकांसह अलिबागकरांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी स्थानिक कलाकारांसह आलेल्या पर्यटकांपैकी कलाकारांनीही आपली कला सादर केली…रायगड टाइम्सकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येता. अलिबाग समुद्र किनार्यावर गेल्यावर्षीपासून दर शनिवार आणि रविवारी हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे…पावसाचे तीन महिने संपल्यानंतर शनिवारी 2 नोव्हेंबरपासून हा शो पुन्हा एकदा सुरु करण्यात आला आहे.
प्रतिम सुतार आणि योगश पवार यांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली आहे… गायक लाभेश पाटील,अलंकार पाटील, मोनिका पाटील यांनी आपल्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर सारथी माळी, भुषण सुतार जिवन पवार तेजस माळी यांच्या वाद्याच्या तालावर पर्यटकांना थीरकायला भाग पाडले…लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार हर्षद कशाळकर, लोकमतचे निखील म्हात्रे, न्यूज 18 चे मोहन जाधव तसेच अन्य पत्रकारांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली…अनिकेत काठे आणि आदित्य बोर्लीकर, अमोल दरडीगे, कुल्फीवाला यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले… दरम्यान, रायगड जिल्ह्यातील पर्यटन वाढावे, स्थानिकांना यातून रोजगार मिळावा हा उद्देश असून रायगडात येणार्या पर्यटकांनी आनंद घेवून परत जावे ही मुख्य धारा या कार्यक्रमाची असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजन राजन वेलकर यांनी म्हटले आहे…