उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
१९०- उरण विधानसभा मतदारसंघातून १६ उमेदवाराचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. दि. ४ नोव्हेंबर रोजी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या आखाड्यात १४ उमेदवार रिंगणात असल्यासचे माहिती प्राप्त झाली आहे… उरण विधानसभा निवडणुकीत छाननी नंतर १६ उमेदवाराचे १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.त्यामधील अपक्ष उमेदवार संतोष ठाकूर आणि जितेंद्र म्हात्रे यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले…
निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार…
१) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर, २)शेतकरी कामगार पक्षाकडून प्रितम जनार्दन म्हात्रे ,३ ) भारतीय जनता पार्टीकडुन महेश बालदी, ४) नवनिर्माण सेनेकडून सत्यवान भगत, ५) बहुजन समाज पक्षाचे गायकवाड आहेत, ६) महेश कोळी लोकराज्य पक्षाकडून आहेत, ७) अपक्ष उमेदवार सौ. श्रीकन्या डाकी, ८) अपक्ष उमेदवार कुंदन घरत, ९) अपक्ष उमेदवार निलम कडु, १०) अपक्ष उमेदवार बाळकृष्ण घरत, ११) अपक्ष उमेदवार कृष्णा वाघमारे, १२)अपक्ष उमेदवार मनोहर परशुराम भोईर, १३)अपक्ष उमेदवार प्रितम धनाजी म्हात्रे, १४) अपक्ष उमेदवार प्रितम बळीराम म्हात्रे असे एकूण १४ उमेदवार रिंगणात अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.उध्दव कदम यांनी दिली आहे.