पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधात उबाठा शिवसेना की शेकाप असा प्रश्न कायम असताना आता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र फक्त पाच जणांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे रविंद्र पाटील विरोधात शेकापचे अतूल म्हात्रे व उबाठा शिवसेना गटाचे प्रसाद भोईर हे दोघेही उमेदवार कायम राहिल्याने आता पेण मध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे…अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात अपक्ष उमेदवारांमध्ये नमिता नंदकुमार म्हात्रे, दशरथ साळवी, नरेश पाटील, पल्लवी प्रसाद भोईर, संजय हिरामण म्हात्रे व शेकापचे सुरेश खैरे या 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. भाजपच्या कौसल्या पाटील यांचाही अर्ज बाद करण्यात आला…विधानसभा निवडणुकीच्या लढतीत कायम असणाऱ्या उमेदवारांमध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे रवींद्र पाटील हे कमळ फुल या चिन्हावर तर उबाठा शिवसेना गटा तर्फे प्रसाद भोईर हे मशाल ह्या चिन्हावर व शेतकरी कामगार पक्षातर्फे अतुल म्हात्रे हे शिट्टी ह्या चिन्हावर तसेच अभिनव भारत पार्टीच पाळ पाटील हे माईक ह्या चिन्हावर, बहुजन समाज पार्टीच्या अनुजा साळवी ह्या हत्ती चिन्हावर, वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र कोळी हे गॅस सिलिंडर विन्द्रावर तर अपक्ष विश्वास बागुल हे ईत्री या चिन्हावर निवडणूक लढवणार असून हे सात उमेदवार आता पेण मध्ये एकमेकांच्या विरोधात कायम राहणार आहेत.