रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष व अलिबाग विधानसभा मतदार संघाचे “विधानसभा निवडणूक प्रमुख” म्हणून कार्यरत असलेले दिलीप विठ्ठल भोईर उर्फ छोटमशेठ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपने त्यांच्याविरोधात पक्ष विरोधी कारवाई केली आहे… या कारवाईने भाजपमधील छोटमशेठ समर्थक कार्यकर्ते संतप्त झाले आहेत… भाजप शेतकरी बहुजन समाजातील नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा फक्त उपयोग करून घेत असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली… आज अलिबागच्या राजकारणातील बाहुबली असलेल्या छोटमशेठ यांच्यावर कारवाई झाली… उद्या शेकाप पक्षातूनच भाजपात गेलेल्या धैर्यशील पाटील यांच्यावरही कारवाई होऊ शकते,कारण धैर्यशील पाटील हे शेतकरी बहुजन समाजातील नेतृत्व आहेत…धैर्यशील पाटील यांनी भाजपने दिलेल्या खासदारकीवर जास्त उडू नये… भाजपचा थिंक ट्यांक कधी त्यांचे पंख कापेल हे सांगता येणार नाही…
अलिबाग विधानसभा मतदार संघात तयार झालेली परिस्थिती 2019 च्या निवडणुकीत उरण मतदार संघात तयार झाली होती. भाजपचे आमदार महेश बालदी यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती… त्यावेळी भारतीय जनता पार्टीन महेश बालदी यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही… छोटमशेठ यांच्यावर कारवाई करणारे सध्याचे ठराविक सुरमा त्यावेळी भाजपमध्ये होते… मात्र त्यांनी महेश बालदींवर कारवाई केली नाही… महेश बालदी हे आरएसएसचे केडर आहेत… शेठजी- भटजी वर्गातील आहेत… शेठजी-भटजी विरुद्व बहुजन समाज ही मांडणी राष्ट्रपिता जोतिबांची आहे… याउलट छोटमशेठ शेतकरी बहुजन समाजातील आहेत… त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजपातील सर्व सुरमा पुढे सरसावले… भाजप नेहमी निवडून येण्यासाठी शेतकरी बहुजन समाजाचा फक्त उपयोग करतो… आणि मानाचे पान आपल्या लोकांच्या पुढ्यात ठेवतो… मात्र यापुढे भाजपचे हे सत्तालोलुप राजकारण चालणार नाही… असा इशारा चळवळीतील कार्यकर्ते देत आहेत…
दिलीप भोईर हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले… त्यामुळे अलिबागचे राजकीय वातावरण ढवळून निघाले…छोटमशेठ राजकारणातील बाहुबली आहेत हे दिसून आले… भोईर हे पूर्वी शेकापक्षात होते. दोन वर्षापूर्वी ते भाजपमध्ये आले… अलिबाग मुरुड मतदार संघात भोईर यांनी भाजपची ताकद प्रचंड वाढविली… अलिबागचा पुढील आमदार भाजपचा असेल असे वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबाग येथे केले होते. त्यामुळे भोईर हे भाजपा उमेदवारी देईल म्हणून आशावादी होते. मात्र बावनकुळे यांनी शब्द फिरविला… दिलीप भोईर निवडणूक रिंगणात असल्याने महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना अधिक धोका आहे… अलिबगमधून शेकापच्या चित्रलेखा पाटील व शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांच्यात थेट लढत आहे… या लढतीचा फायदा छोटमशेठ यांना होऊ शकतो… असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे…