महाड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. वाहनचालक व प्रवाशी वर्गाचे या खड्ड्यातून प्रवास करताना अतोनात हाल होतायत, शारीरिक वेदनेबरोबरच खड्ड्यात वाहने आदळून वाहनात ही बिघाड होतोय. खड्ड्यांच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात खड्ड्यात पोहण्याची स्पर्धा घेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. महाड नगरपरिषद प्रशासकीय कारभाराच्या विरोधात यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून महाड नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला.लवकरात लवकर खड्डे न बुजविल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.