उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काळ सुरु झाला आहे…प्रत्येक उमेदवार मतदारसंघ बांधणीचे काम करत आहे…रायगडमधील उरण मतदारसंघातही महेश बालदी यांनी मतदारसंघात प्रचार सुरु केला असून या प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आगरी समाजाच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागत आहे. तसेच त्यांनी त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी ही मागणी ही केली जात आहे…राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत, त्या निवडणुकीमध्ये अखिल आगरी समाज परिषद राजकारणापासून अलिप्त आहे असे असताना उरण विधानसभेतील उमेदवार महेश बालदी यांनी एका जाहीर सभेत मी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेच्या निवडणूकीला उभा नसून, विधानसभेच्या निवडणूकीला उभा आहे,असे वक्तव्य करून आगरी समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांचे वक्तव्य निषेधार्ह असून आगरी समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी…असे अखिल आगरी समाज परिषदेने त्यांना सुचविले आहे…बालदी यांच्या या वक्तव्यामुळे भूमीपुत्रांच्या अस्मितेला धक्का पोहोचला आहे…बालदी यांनी केलेले हे वक्तव्य निषेधार्ह असून त्यांनी अद्यापही आगरी समाजची माफी न मागितल्याने आगरी समाजातर्फे १२ नोव्हेंबर रोजी महेश बालदी यांचा निषेध करण्यासाठी उरण पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे…