पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदीप मोकल):-
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अनेक प्रकल्प येऊ पाहत आहेत… मात्र हे प्रकल्प येत असताना शेतकऱ्यांना किंवा भूमिपुत्राला विश्वासात न घेता सक्तीचे संपादन करण्याचे काम शासनामार्फत सुरु आहे. तसे न होता ज्या ठिकाणी प्रकल्प येणार असेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला किंवा भूमिपुत्राला केंद्रस्थानी ठेवून, त्याला विश्वासात घेऊन प्रकल्प प्रस्थापित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पेण विधानसभा मतदार संघाचे शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी वडखळ डोलवी येथे प्रचार फेरीत केले…
रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांचे मार्गदर्शनाखाली वडखळ नवेगाव,डोलवी परिसरात येथे शेकाप उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीला उत्सफुर्त प्रतिसाद लाभला या प्रचार रॅलीचा शुभारंभ वडखळ येथील गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला…यावेळी पेण विधानसभा मतदार संघाचे शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे, काॅगेस तालुकाअध्यक्ष अशोक मोकल वडखळ ग्रामपंचायत सदस्य निळेश म्हात्रे लक्ष्मण गांवड आदि सह असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महिला उपस्थित होते. शेतकरी हाच खरा विकासक बनला पाहिजे ही भूमिका आम्ही घेऊनच शेतकऱ्यांना न्याय मिळऊन देण्यासाठी आम्ही पुढे सरसावले आहेत… गेले अनेक वर्ष झाली इथल्या प्रस्थापितांनी अजून देखील इथला पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही. पण येत्या दिवसांमध्ये येथील जनतेला माझ्याकडून अपेक्षा आहे की हा प्रश्न कायमचा सुटावा आणि मी कबुली देतो की हा प्रश्न मुळापासून सोडवणार आहे. पण त्याचबरोबर मी या विभागातल्या युवकांसाठी देखील रोजगाराची समस्या आहेत या रोजगाराच्या समस्येवरती मी काम करणार आहे. या विभागात वाड्या-वस्त्या गावांपासून दूर आहेत त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतावर आणि वाड्यांवर जी घर आहेत इथे अजून देखील गाडी पोहोचत नाही अजून देखील रस्ते झाले नाही पाण्याची कुठली सुविधा नाही तसेच येथील जनता वर्षभर पागोळी, विहिरीतलं पाणी पितात या ज्या काही समस्या आहेत या समस्यांवर कायमचा तोडगा काढून येथील परीसर सुजलाम सुफलाम करणार आसल्याचे अतुल म्हात्रे यांनी या वेळी सांगितले…