अलिबाग खारेपाट शिवसत्ता टाइम्स (महेंद्र म्हात्रे):-
तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासासाठी प्राधान्य दिले जाईल असे मत 193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील तरुण तडफदार व लोकप्रिय उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी तळा तालुक्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केले…यावेळी त्यांनी आपली निवडणूक निशाणी लिफाफा म्हणजे प्रेमाचे आहेर पाकीट मतांनी भरून द्या… असे आवाहन जनतेला केले…ते पुढे म्हणाले की या परिसरात आदिवासी बांधव,मुस्लिम बांधव ,दलित बांधव, गवळी बांधव व समाजातील सर्वच घटक असून येथील ग्रामीण आदिवासी वस्ती व तळागाळातील जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत…या जनतेच्या व्यथा व त्यांच्या समस्या घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर अजूनही येथील जनतेचे प्रश्न तसेच आहेत…महत्वाचे म्हणजे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए.आर.अंतुले साहेब यांचा हा बालेकिल्ला… त्यांच्या काळात या परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली होती… मात्र सध्या गेले अनेक वर्ष येथील सत्ताधारी आमदार खासदार मंत्री झाले मात्र तरीही त्यांनी या भागाचा विकास केलेला नाही… ही मोठी शोकांतिका आहे…
निवडणुका आल्या की येथील जनतेचा वापर करून घ्यायचा आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडायचे मात्र जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही…तसेच जनतेला भुलथापा व खोटे आश्वासन देणार नाही…तर प्रत्यक्षात विकासकामांची कृती करू… विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले तसेच काँग्रेस नेते व माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी लाभले आहे…स्वर्गीय मधुकर ठाकूरांचा सुपुत्र म्हणून मी राजाभाऊ मधुकर ठाकूर 193 श्रीवर्धन मतदारसंघात निवडणूक लढवत आहे… विशेष म्हणजे या झंजावत प्रचार दौऱ्यात विविध पक्षांचे तसेच विविध राजकीय पक्षांचा तसेच राजकीय संस्थांचा, संघटनांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे राजाभाऊ ठाकूर म्हणाले…