स्थानिकांना रोजगार देण्यात विद्यमान आमदार अपयशी…प्रसाद भोईरांसारखा उमेदवार विधानसभेत पाठवा… 

0
54

 पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदीप मोकल):-

जेएसडब्ल्यू सारखी मोठी कंपनी पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे या कंपनीत हजारो परप्रांतीय कामगार आहेत. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरले आहेत. म्हणून येथील नागरिकांना प्रसाद भोईर सारखा उच्चशिक्षित, दूरदृष्टी असलेला, प्रशासनाची माहिती असलेला तरुण उमेदवार विधानसभेत हवा आहे. पेण सुधागड मतदारसंघातील सुज्ञ मतदार येत्या 20 तारखेला प्रसाद भोईर यांच्या नावासमोरील मशालीच्या चिन्हाचे बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून देतील याची मला खात्री आहे असा विश्वास बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला…मागील अडीच वर्षात महायुतीच्या काळात वेदांता,सैफरन, टाटा एअरबस सारखे प्रकल्प हजारो युवकांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेलेत. त्यामुळे बेरोजगारी वाढतच चालली आहे. स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटणे, नोकर भरतीत घोटाळे, ६२ हजार शाळा खाजगी कंपन्यांना दिल्या आहेत, १७ हजार १४३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. राज्यावर पावणे नऊ लाख कोटींचा कर्ज, महायुती सरकारच्या या कृत्यांमुळे जनता महायुतीच्या उमेदवारांना घरी बसवतील व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील व महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असे प्रतिपादन नितीनबानगुडे पाटील यांनी केले…या प्रचार सभेला शिवसेना उपनेते प्रवक्ते नितीन बानगुडे पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे,  माजी तहसीलदार सुभाष म्हात्रे, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रसाद भोईर, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महेश पोरे,तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर,  विधानसभा सह समन्वयक समिर म्हात्रे, हिराजी चोगले,गजानन मोकल, संताजी शेळके आदींसह शिवसैनिक व पेण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.