Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडमहाराष्ट्रात कुठे किती मतदान झाले ?... पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर...

महाराष्ट्रात कुठे किती मतदान झाले ?… पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर…

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे…सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात पहिल्या टप्प्यात कुठे किती मतदान झाले, याची आकडेवारीही समोर आली आहे… मुंबई शहरात सकाळी ९ वाजेपर्यंत 6.25 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक ८.३१ टक्के मतदान हे मलबार हिल मतदारसंघात झाले आहे. तर धारावी मतदारसंघात सर्वात कमी ४.७१ टक्के मतदान झाले आहे. धारावीत 4.71 टक्के, सायन-कोळीवाडा: 6.52 टक्के, वडाळा 6.44 टक्के, माहीम: 8.14 टक्के, वरळी: 3.78 टक्के, शिवडी : ६.१२ टक्के, भायखळा: 7.09 टक्के, मलबार हिल: 8.31 टक्के, मुंबादेवी 6.34 टक्के आणि कुलाबा: 5.35 टक्के मतदान झाले आहे…

मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यात सकाळी ९ पर्यंत 5.53 टक्के मतदान झाले आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी समोर आली आहे. यात कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ 7.44%. मतदान झाले आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ 5.53% मतदान, हडपसर विधानसभा मतदारसंघ 4.45 टक्के मतदान, पर्वती विधानसभा मतदारसंघ 6.30% मतदान, खडकवासला विधानसभा मतदारसंघ 5.44% मतदान, कोथरूड विधानसभा मतदारसंघ 6.50% मतदान, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ 5.29% मतदान, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ 6.37% मतदान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments