नेरुळ शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-
समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारे युवा ग्रामीण पत्रकारसंघ कार्यालय छत्रपती संभाजीनगर, माहूर, जिल्हा नांदेड यांच्या सहकार्याने संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश रामराव कचकलवार यांचे नेतृत्व तसेच मार्गदर्शनाने महाराष्ट्र वेदभुमी न्युज चॅनलच्या संपादिका सौ.जान्हवी जयेश भोईर यांची राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ नवीमुंबई येथे महिला जिल्हाध्यक्ष पदावर दि.८डिसेंबर २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे… त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन तसेच शुभेछा!
युवा ग्रामीण पत्रकार संघ ही पत्रकारांच्या सामाजिक हक्कासाठी सदैव काम करणारी संघटना आहे… तसेच या संघटनेचा महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वत्र देशभर काम करण्याचा मानस आहे… या अनुषंगाने सर्व पत्रकार बांधवांना एकजूट करण्याचे मोलाचे कार्य या संघटनेमार्फत करण्यात येत आहे… तसेच पत्रकारांना त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचे पाठबळ या संघटनेतून मिळत आहे… त्यामुळे न्याय हक्कासाठी लढणारा पत्रकार, समाजातील घडामोडीबाबत पारदर्शकता जनतेच्या नजरेत आणून देण्यासाठी काम करणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी ही तर अत्यंत आनंदाची व महत्त्वपूर्ण अशी अनमोल गोष्ट आहे…