नियम धाब्यावर बसवून पनवेल मनपाची कारवाई ?…नोटीस न देता व्यावसायिकांचे बोर्ड आणि शेड तोडले…

0
52

खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागांतर्गत प्रभाग कार्यालयाकडून गेल्या काही दिवसांपासून हातगाड्यांवर तसेच अनधिकृत बांधलेल्या झोपड्या, दुकानांबाहेर अनधिकृतरीत्या ठेवलेल्या सामानावर आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार तोडक कारवाई करण्यात येत आहे… त्यानुसार खारघर सेक्टर २२ येथे अनधिकृतरीत्या वसलेल्या झोपडपट्टीवरती तोडक कारवाई करण्यात आली होती… तसेच बुधवार दि.११ डिसेंबर रोजी खारघर येथील सेक्टर-३ मध्ये गॅरेजलाईनवर देखील कारवाई केली… नियमांनुसार अतिक्रमण विभागाने कारवाई करण्याआधी नोटीस देणे गरजेचे असते… मात्र पनवेल मनपाने नियम धाब्यावर बसवून कारवाई केली असल्याचे व्यावसायिकांमध्ये बोलले जात आहे… व्यावसायिकांना कोणतीही पूर्वकल्पना तसेच जाहीर नोटीस न देता दुकानदारांचे बोर्ड आणि शेड तोडले… यावेळी पत्रकारांनी पनवेल महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर जितेंद्र मढवी यांना कारवाई संदर्भात विचारले असता त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले… तसेच पत्रकारांनी इतर अधिकाऱ्यांशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली… दुकानदारांच्या म्हणण्यानुसार पनवेल महापालिकेकडून नोटीस दिली असती तर आम्ही दुकानाचे शेड आणि बोर्ड काढले असते…