दोन ट्रेलरची समोरासमोर भीषण धडक… अपघातात दोन्ही ट्रेलरचे जबरदस्त नुकसान…

0
57

 उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

वाहनांची संख्या वाढल्याने रस्ते अपघाताच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे… गेल्याच आठवड्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देखील लोकसभेतील चर्चेत अपघाताच्या वाढत्या घटनांवर भाष्य करत खंत व्यक्त केली होती. कारण, अपघातांची मालिका संपता-संपेना झाली आहे… त्या उरण तालुक्यातील पागोटे-नवघर रोडवर ट्रेलरचा भीषण अपघात झालाय… उरण तालुक्यातील पागोटे-नवघर रोडवरील उभ्या असलेल्या एम.टी. ट्रेलरला सवॅश्वर लॉजिस्टिकचा ट्रेलर क्रमांक एच ०४ सीयु १७११ याने जोरदार धडक दिली… यात दोन्ही ट्रेलरचे जबरदस्त नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही… सदरचा अपघात सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सायकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान झाला आहे…सवॅश्वर लॉजिस्टिकचा चालक वाहन दारू पिऊन चालवत होता… असे तपासात निष्पन्न झाले आहे… ओव्हरलोड घेऊन,दारु पिऊन वाहन चालवणारा चालक, मालक यांच्यावर कारवाई करण्यास आरटीओ,वाहतूक पोलीस आर्थिक साटेलोटेमुळे कुचकामी ठरत आहेत… असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे…