नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
रायगडमधील कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेऊन व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.रविवार दि..१५ रोजी रात्री भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64 64 (2) (1) (m) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,14,15 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (E) प्रमाणे नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी अक्षय दशरथ ऐनकर वय अंदाजे २३ वर्ष हा तरुण सध्या फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.फिर्यादी मुलगी अल्पवयीन आहे हे आरोपीस माहीत असताना देखिल पिडीत मुलगी हीचे सोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून तुझे आई वडीलांना ठार मारुन टाकेन अशी धमकी देवुन तिची इच्छा नसतानाही वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापितकरुन आरोपी याने त्याचे लैगिंक समाधनाच्या प्रयोजनार्थ पिडीतेसोबत शरिर संबंध करतानाचा व्हीडीओ इंटरनेटच्या माध्यमातुन प्रसारीत केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे नेरळ पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत.