आक्षी पुलानजीक दुचाकीची कारला जोरदार ठोकर…अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी… 

0
106

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमूलकुमार जैन):- 

रायगड जिल्ह्यातील अलिबाग रेवदंडा रस्त्यावरील मौजे नवेटर बेली व आक्षी गावादरम्यान असणाऱ्या आक्षी पुलानजिक मोटर सायकलने कारला समोरून ठोकर मारून अपघात झालाय…या अपघातामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले…त्यात दुचाकीचे खुपच नुकसान झाले आहे… ही घटना रविवारी  दि.15 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली…पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील नारायण बागुल हे सध्या मुरूडमध्ये राहत आहेत. मुरूडमधील एका विद्यालयात ते शिक्षक म्हणून नोकरी करीत आहेत. शुक्रवारी (दि.13) ते नाशिकला गेले होते. रविवारी (दि. 15) ते नाशिककडून मुरूडकडे येण्यास निघाले…नागावमार्गे रेवदंड्याकडून ते मुरूडला त्यांच्या कारने जात होते…रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नवेदर बेली ते आक्षी पुलाजवळ आल्यावर समोरून एक दुचाकी आली…कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीचालक सागर पाटील हा गंभीर जखमी झाला. तो कुरुळ येथील रहिवासी आहे. त्याच्यावर अलिबागमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत…हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून कारच्याही पुढील भागाचे नुकसान झाले आहे…याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे…याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सोनकर करीत आहेत…