हायस्कूलच्या आवारात शिवीगाळ व विनयभंग… माणगाव पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल

0
49

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

माणगाव तालुक्यातील विळे (हिरालाल महादेव मेथा ) हायस्कूल येथे जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापक,/संस्थापक/ सदस्य/ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे… मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार परशुराम हरिचंद्र आंबेतकर वय वर्ष 51 राहणार रोहिदासनगर- वीळे हे एसी मागासवर्गीय समाजाचे असल्याचे माहित असताना देखील हायस्कूलचे  मुख्याध्यापक) राजेंद्र अमरनाथ ठाकूर, 2)हायस्कूलचे संस्थापक _सुभाष हिरालाल मेथा,3) महादेव ताम्हणकर ४)तानाजी भोकर हे सदस्य या चौघांनी जातिवाचक तसेच आई बहिणी विरुद्ध अरवाच भाषेत शिवीगाळ केली…तसेच यातील राजेंद्र ठाकूर यांनी परशुराम आंबेतकर यांच्या पत्नीस  छातीत  हाताने धक्काबुक्की करून खाली पाडले व हातात दगड घेऊन ठार मारीन अशी धमकी दिली…त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र ठाकूर व सदस्य तानाजी भोकर यांनी शाळेमध्ये पाणी पिण्यास गेले असता तेथे मज्जाव केला व तेथील ५)विद्या नलावडे हिने परशुराम आंबेतकर याला झोडपिन अशी धमकी दिली…याप्रकरणी पाच जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे…घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस उप विभागीय अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी तसेच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बो-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत….दरम्यान याप्रकरणी नेमकी वस्तुस्थिती काय ?याचेच स्पष्टीकरण विळे येथील हायस्कूल व्यस्थापनाने द्यावी अशी मागणी होत आहे…ज्यांच्यावर आरोप आहे अशा पाच जणांनी आपलीही बाजू मांडावी असे मत व्यक्त होत आहे…