महाड एमआयडीसीतील ॲटेस्ट कंपनीत स्फोट… कंपनीच्या स्फोटातील जखमींचा आकडा ९ वर…

0
62

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र परिसरातील काळीज गावाच्या हद्दीतील ॲस्टेक लाइफ सायन्स लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये गुरुवार दि.19 डिसेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक एका रसायन असलेल्या टाकीमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊन टाकीचा भीषण स्फोट झाला.या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की त्याचा आवाज परिसरातील तीन किलोमीटर पर्यंत पसरला. या स्फोटाच्या तीव्रतेने उडालेले प्लांटचे पत्रे व लोखंडी तुकडे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना लागून ते जखमी झाले…रितेश रामदास निंबरे,वय- 19 वर्षे,राहणार-महाड,वसंत दगडू जंगम, वय- 43 वर्षे राहणार- महाड,आर्यन राजीव रॉय, वय-20 वर्षे राहणार- महाड. दिनेश गणपत म्हसळकर,वय -21 वर्षे,राहणार-माणगाव,प्रशांत गोविंद चाचले,वय-22 वर्षे राहणार-पोलादपूर. प्रथमेश दत्ताराम मुसळकर, वय-23 वर्षे,राहणार-माणगाव यांसह रामचंद्र ,गुलाबचंद आणि तेजस निंबरे अशी या नऊ जखमींची नावे आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले… सदर घटनेची पोलिसांनी चौकशी केली असता या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही सुरक्षा उपकरणे प्रदान करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.

कामाच्या ठिकाणी अशा बेजबाबदार व निष्काळजीपणाबाबत पोलिसांकडून कारखान्यातील प्लांट हेड-निरंजन अविनाश बर्डे,सेफ्टी ऑफिसर -ऋषिकेश प्रकाश भोज,शिफ्ट इन्चार्ज -संकेत गोविंद मोरे,एच आर मॅनेजर-गौरी जितेंद्र तेलंगे,कंपनीचे सुरक्षा परवानगी देणारे अधिकारी-अनिल केशव देसाई,कंपनीचे प्लांट हेड-अनंत अशोक मुळे,अभिजीत थरवळ,योगेश देशमुख,रहातेकर या नऊ जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 212 (अ), 288, 289, 125(अ) तसेच 3(5) नुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे…