वृद्ध महिलेवर १८ वर्षीय मुलाकडून अत्याचार…अत्याचारप्रकरणी निजामपूरकरांचा आक्रोश…

0
53

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-       

निजामपूर येथे १८ वर्षांच्या मुलाने ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे… माणगाव पोलीस ठाण्यात २० डिसेंबर रोजी या घटनेची नोंद करण्यात आली आहे… निजामपूर येथे राहणाऱ्या १८ वर्षीय सिद्धेश घोणे याने पीडित महिलेच्या घरात घुसून अत्याचार केला… यावेळी त्या महिलेने विरोध केल्याने तिला जबर मारहाण करण्यात आली…यानंतर माणगाव तालुक्यात या घटनेच्या निषेधार्ह पडसाद उमटत आहेत…असाच निषेध मोर्चा निजामपूर शहरातील महिला भगिनींनी तसेच सामाजिक संस्थांकडून रविवार दि. २२ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला… या मोर्चात आरोपीला फाशी द्या… कडक कारवाई करा …आणि आजीला न्याय द्या…अशा घोषणा देण्यात आल्या…यावेळी आरोपी विरोधात योग्य ती दखल न घेतल्यास या आंदोलनाचे उग्र स्वरूप माणगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगडात दिसून येईल असे वक्तव्य आंदोलककर्त्यांनी केले आहे…तसेच या घटनेच्या निषेधार्ह २३ डिसेंबर रोजी निजामपूर येथील व्यापारांकडून कडकडीत बंद पुकारण्यात आला…यामध्ये दवाखाने,मेडिकल,बँक व अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी या बंदमध्ये सामील झाले होते…