पोस्को कंपनीत शेतकऱ्यांकरिता बायो गॅस कार्यशाळा संपन्न…

0
60

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील ) :- 

पोस्को कंपनीमध्ये दिनांक २० डिसेंबर रोजी वर्षभरातील चौथ्या त्रैमासिक माध्यम संवाद आणि शेतकरी मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते…हे एकूण १५ वे सत्र होते…कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली…पोस्कोचे उप व्यवस्थापकीय संचालक श्री. ईन क्यो बे, यांनी त्यांच्या भाषणात पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या कल्याणकरी उपक्रम आणि आसपासच्या विकासासाठी दृढ वचनबद्धतेची पुष्टी केली. वक्ते म्हणून भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांना निमंत्रित केले होते. भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने गेल्या दोन पेक्षाही अधिक दशके सातत्यपूर्ण काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी, ग्रामीण विकास आणि संबंधित क्षेत्रात भरीव काम करुन दाखविले आहे. त्यांच्या  उल्लेखनीय योगदानासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. देवधर यांनी त्यांच्या यशस्वी प्रकल्पाच्या विविध नियमांबद्दल अनमोल माहिती सांगितली… भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान मार्फत ९,००० हून अधिक बायोगॅस बांधले आहेत, ३५० कुक्कुटपालक शेतकरी, ३०० एकरावर सिंचन सुविधा, बचत गट व अनेकांना रोजगार उपलब्ध, युवक कल्याण, बालविकास व महिला सक्षमीकरणाचे कार्य, अंड्याचे गाव वाडोस येथे समूह शेतकरी विकासातून दरमहा १ लाख अंडी तयार होतात, २० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रकल्पामाध्ये सहाय्यकारी संस्था म्हणून काम केले. असे अनेक उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवले जातात.डॉ. देवधर त्यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले, त्यांची आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तिकडे पाहण्याची आणि सोबतच उपजीविका उपक्रमांबद्दल असलेली कृतीशील धोरणे फारच महत्वाची वाटली.शाश्वत ग्रामीण आनंदमयी ग्रामीण जीवन अशी कल्पना विरळ होत असतानाही सुयोग्य सामूहिक प्रयत्नांतून बऱ्याच गोष्टी शक्य आहेत मात्र काही जणांनी एकत्र येवून पुढाकार घेण्याची गरज असते. आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून भगिरथला या…असा आग्रह डॉ. देवधर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला २० पत्रकार आणि ५१ शेतकऱ्यांसह (महीला – पुरुष) एकूण ७१ उपस्थितांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसला. डॉ. देवधर यांच्या अंतर्दृष्टी आणि जनसमुदायाच्या विकासाला चालना देण्यासाठी पोस्कोच्या पुढाकारांची प्रशंसा करून आयोजनाचे व अश्या नियमित संवाद सत्राचे प्रचंड कौतुक केले.आजूबाजूच्या भागात उन्नतीसाठी पॉस्को महाराष्ट्र स्टीलच्या प्रयत्नांना स्थानिक समुदायाकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहून खरोखरच आनंद झाला. आम्ही भविष्यात असे आणखी अर्थपूर्ण आणि परिणामकारक कार्यक्रम आयोजित करण्यास उत्सुक आहोत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.