रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महाराष्ट्राच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार नुकसान झाला…या मंत्रिमंडळात नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांनी महिला व बालविकास मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर रोह्यातील दमखाडी नाक्यावर ढोल,ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत झाले…दमखाडी प्रभाग क्रमांक ७ च्या सर्व महिलांनी मंञी मंडळातील लाडक्या बहिणीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
मंत्री महोदय म्हणून रोहा तालुक्यात प्रथमच अदिती तटकरे आल्या होत्या…त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता व आनंदाचा वातावरण पाहायला मिळत होतं…दमखाडी नाक्यावर असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले…तर तालुक्यातील वरसे, धाटाव तसेच नाक्या नाक्यावर स्वागत केले…यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या…आदितीताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, रायगडचा पालकमंत्री अदिती ताई,अदिती ताई रायगडचा पालकमंत्री अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दमखाडी येथे दिल्या….
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेश कोल्हटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, हृदयरोग तज्ञ अशोक जाधव,रोहा शहर अध्यक्ष अमित उकडे उपस्थित होते…