मराठा नेत्यावर किरकोळ वादातून चाकूहल्ला… आरोपी मनीष भगत नेरळ पोलिसांच्या ताब्यात… चाकू हल्ल्यामुळे तालुक्यात शांतता पसरली 

0
46

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-  

एका किरकोळ वादातून मराठा समाजाचे नेते अनिल भोसले यांच्यावर कर्जत तालुक्यात चाकू हल्ला झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आणि मराठा समाज आक्रमक झाला. मात्र, घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपीला अटक केली. त्यामुळे कुठलाही तणाव निर्माण झाला नाही.अनिल भोसले हे मराठा समाजाचे नेते असून ते रविवारी सालवड येथे लग्न समारंभातून परतत होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास भिवपुरी रेल्वे स्टेशन जवळील चिंचवली रेल्वे गेटजवळ वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत चिंचवली येथील मनीष भगत यांचीही गाडी अडकली होती. वाहतूक कोंडीतून गाडी काढताना अनिल भोसले आणि मनीष भगत यांच्यात शाब्दिक वाद झाला. याचा राग येऊन मनीष भगत यांनी थेट भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी भगत यांच्यासोबत आणखी चौघे होते. भगत यांनी भोसले यांच्यावर चाकूहल्ला केल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. तशी जखमी अवस्थेत जीव वाचवून गाडी चालवत त्यांनी घर गाठले.मात्र, सुडाने पेटलेला मनीष भगत आणि त्यांच्या साथीदारांनी भोसले यांचा पाठलाग केला. रात्री ही घटना घडल्याने भोसले यांचे कुटुंबीय घाबरले होते.तर जखमी अनिल भोसले यांना अधिक उपचारासाठी पनवेल सुखम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रात्री उशिरा मराठा समाज बांधव हे भोसले यांची भेट घेण्यासाठी एकत्र जमले होते.  या घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आणि इतर अधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी मनीष घरत याला रात्री उशिरा ताब्यात घेतले आणि नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर जखमी भोसले यांना अधिक उपचारासाठी पनवेलमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरा मराठा समाज बांधव भोसले यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात जमले होते.

अनिल भोसले यांच्यावरील हल्ल्यानंतर कर्जत सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी या घटनेचा निषेध करत कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे यांची भेट घेतली आहे.अनिल भोसले हे कर्जत सकल मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात पुढाकार घेत असून त्यांच्याकडे मराठा समाज एक नेतृत्व म्हणून पाहत आहेत.त्यातच बीड जिल्ह्यातील मस्साजोग घटनेतील मराठा समाजाचा सरपंच यांच्यावरील घडलेली घटना ताजी असताना आता कर्जत तालुक्यातून हे प्रकरण वेगळे वळण घेवू नये म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट झाली आहे.दरम्यान अनिल भोसले यांच्या पाठीशी कर्जत सकल मराठा समाज एकत्र उभा राहिला असून घटनेचा निषेध करण्यात आला तर कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांची सकल मराठा समजाकडून भेट घेण्यात आलेली आहे.किरकोळ वादातून करण्यात आलेला हा चाकू हल्ला यामुळे तालुक्यात सद्या शांतता पसरलेली आहे…