पनवेलमध्ये डान्सबारवर कारवाई… ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिलांकडून अश्लील हावभाव…

0
46

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

बारमध्ये महिला वेटर यांच्याकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव, बिभत्स चाळे आणि अंगविक्षेप करून नृत्य करण्यास भाग पाडल्याप्रकरणी ३ पुरुष वेटर,५ महिला आणि संजय गहिनाथ थोटे (भिंगारी) आणि विजय बाबू शेट्टी (गोकुळ सोसायटी, डेरवली), मॅनेजर पंकज नरेश कदम (शिरढोन),कॅशीयर सुनील कुमार राघवेंद्र चतुर्वेद यांच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…२४ डिसेंबर रोजी पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गोपिका कोयल बार या ठिकाणी नोकरनाम्यापेक्षा जास्त महिला वेटर या काम करून त्या महिला ग्राहकांना अश्लील कृत्य करून हातवारे करून बीभत्स वर्तन करत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष दोन,पनवेल यांना मिळाली…त्यानुसार पोलीस रात्री सव्वादहा वाजता बारमध्ये गेले. यावेळी पाच महिला वेटर बारमध्ये सुरू असलेल्या गाण्यावर अश्लील हावभाव,भिभत्स चाळे आणि अंग विक्षेप करून नृत्य करून सहा ग्राहकांना आकर्षित करत होत्या व महिला वेटर यांना बारमधील वेटर प्रोत्साहित करत होते…या महिलांना नोकरनामे बाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे शासकीय परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले…पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बारचे मॅनेजर, कॅशियर, पुरुष वेटर, महिला, बार चालविणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

गुन्हे शाखा कक्ष एक, वाशी, नवी मुंबई यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील ग्रिट्स बार अँड रेस्टॉरंट याच्यावर कारवाई करत तब्बल 51 जणांवर गुन्हा दाखल केला. यावेळी 24 ग्राहकाना बाहेर काढण्यात आले. गोपीनाथ गावंड (सहा.मॅनेजर) यांच्यासह सतरा पुरुष वेटर, 34 महिलांचा यात समावेश आहे…पनवेलचे या ठिकाणी अनेक धन दांडगे मौजमजा करण्यासाठी येत असतात. नुकतेच हिवाळी अधिवेशन सुरू होते…ते संपल्यानंतर पुन्हा एकदा पनवेलच्या बारमध्ये छम छम सुरू झाले असल्याचे पहावयास मिळत आहे…गुन्हे शाखा कक्ष एक नवी मुंबई यांना ग्रिट्स बार अँड रेस्टॉरंट पुणे ते पनवेल जुना हायवे रोडच्या बाजूला ओएनजीसी, काळुंद्रे येथे नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याची माहिती मिळाली…त्यानुसार पोलिसांचे पथक साडे दहा वाजता बारजवळ पोहोचले. यावेळी ग्राहकांसमोर काही महिला तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांच्या अंगाशी लगट व अंगविक्षेप आणि अश्लील नृत्य,कृत्य करत असताना दिसून आल्या…बारमध्ये महिला वेटर यांना साडेनऊ वाजेपर्यंत सर्विस देणे बंधनकारक असतानाही विहित वेळेनंतर महिलांना थांबवून ठेवले आणि ग्राहकांच्या अंगाशी लगट करून अश्लील नृत्य करण्यास मॅनेजर व वेटर यांनी प्रोत्साहन दिले.