उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
दिघोडे गावातील मुलांना शिक्षण घेता यावे, या उद्देशातून ग्रामस्थांनी एकदिलाने शासनाच्या देखरेखीखाली उभारलेली शाळेची इमारत अखेरची घटका मोजत आहे… या ऐतिहासिक वारसा असलेल्या दिघोडे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एकूण ११७ विद्यार्थी हे अभ्यासाचे धडे गिरवत असून, शाळेच्या इमारतीच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे… तरी राज्याचे नवनिर्वाचित शिक्षणमंत्री दादाजी भूसे यांनी सदर शाळेच्या इमारतीची पाहणी करून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घ्यावा अशी मागणी पालकवर्ग करत आहेत… देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिघोडे गावातील रहिवाशांनी हिरीरीने सहभाग घेतला होता… १९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहात दिघोडे गावातील स्वातंत्र्य सैनिक आलू बेमट्या म्हात्रे या शूरवीराला गोळी लागून वीर मरण प्राप्त झाले होते… अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दिघोडे गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी दिघोडे गावातील ग्रामस्थांनी एकदिलाने शासनाच्या देखरेखीखाली रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची उभारणी केली होती… या शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी हे उच्च पदावर पोचून त्यांनी समाजहिताची कामे केली आहेत… आज त्याच प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये पहिली ते चौथीच्या वर्गात एकून ११७ विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत… अशा शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यांची दुरावस्था झाली असून कौलारू छप्पर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे…त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन, दिघोडे नावासह शाळेचे अस्तित्वही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे… तरी राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भूसे यांनी सदर शाळेच्या इमारतीची पाहणी करून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घ्यावा,अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे… दिघोडे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत ही जिर्ण झाल्याने दिघोडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडे नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे… तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे ही शाळेच्या इमारती संदर्भात मागणी केली आहे… त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे…