श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
देशसेवा करून सेवा निवृत्त झालेले रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील दांडगुरी वाकळघर गावचे पाच जवान सैनिक यांचा आपल्या मायदेशीत जल्लोषात स्वागत करण्यात आले… गावकऱ्यांनी या सैनिकांची जंगी मिरवणुक काढत त्यांचे स्वागत केले… यावेळी महिलांनी लेझिम खेळत या सैनिकांची वाजत गाजत स्वागत केले.गावांतील नागरिकांनी फुलांनी सजविलेल्या जीपमधुन या सैनिकांची गावातून मिरवणुक काढली… सुफेदार परशुराम शांताराम कडू, भरत आत्माराम सावंत, सचिन दत्ताराम सावंत पॅरा कमांडो, आदेश शांताराम ओमाले, मोहन गंगाराम सावंत, हे निवृत्त सैनिक आज आपल्या गावी सेवा बजावून घरी परतले…