रायगड शिवसत्ता टाइम्स (अमूलकुमार जैन):-
रायगडच्या मुरुड तालुक्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. मुरुडच्या कोर्लई येथे बोटीत अल्पवयील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेवदंडा पोलीस स्थानकात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेने मुरुड रेवदंडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे…घटनेचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्यात सुरु आहे.सध्या नाताळ आणि नववर्ष अशा लागून सुट्ट्या काढत अनेकजण कोकण, गोवा अशा पर्यटनस्थळी फिरण्यासाठी जात आहेत. शाळांच्या सहलीही मुरुड जंजीरा, कोर्लई, अलिबाग अशा ठिकाणी सर्रास जाताना दिसत असताना लैगिंक अत्याचाराची ही घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली असून पर्यटकांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धास्तावले आहेत…या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरुड तालुक्यातील एका गावात दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सात वर्षीय पीडित मुलगी ही तिचा भाऊ आणि बहीण यांच्यासोबत शौचास गेली होती. सदर ठिकाणी आरोपी याने येवून पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिचे अज्ञान असण्याचा फायदा घेवून तिला एकटीलाच समुद्र किनारी उभ्या केलेल्या एका बोटीत घेवून जावून तेथे तिच्या गुप्तांगात हाताची बोटे घालून त्या जागेवर गंभीर दुखापती करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात दिनांक 28डिसेंबर 2024 रोजी रात्री अकरा वाजून 32 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत नराधमाने समुद्र किनारी असलेल्या एका होडीत. नेऊन तिने तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीने याबाबत कोणालाही काही सांगू नये तसेच घरी जावून होडीचा गळ गुप्तांगला लागला आहे असे सांगण्यास भाग पाडले व तिच्या हातावर मारहाण देखील केली आहे.याबाबत अधिक तपास मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलिस उप निरीक्षक एम टी शिंदे या करीत आहेत.बावीस वर्षीय नराधम यांच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होर धरत आहे.
ही घटना अत्यंत नीच वृत्तीची आहे. काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये देखील अल्प वयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला होता. अशा घटनेतील आरोपी यांना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि हा खटला जलदगतीने न्यायलायत चालविण्याची मागणी सामजिक कार्यकर्ती रुपाली पेरेकर यांनी केली आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवून सदर पीडित मुलीची चौकशी करण्याची सूचना केली आहे. तसेच तिला पोलिस विभागाकडून सर्वतोपरी न्याय मिळणार असल्याची ग्वाही रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अभितजित शिवथरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं.व कलम1कॉ.गु.रजि.नं.१७२/२०२४ भारतीय न्याय. संहीता २०२३ चे कलम ६५ (२),६४ (एल) सह लैंगिक १७२/२०२४ भारतीय न्याय. संहीता २०२३ चे कलम अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ३ (बी), ४(२), ५ (एम), ६(१), ७,८, ९ (एच), ९ (एम), १०,१२ दाखल करण्यात आला आहे.