बी.जी.शिर्के कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला मारहाण… रसायनी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

0
58

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-  

पाताळगंगा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील चावणे गावच्या हद्दीत असलेल्या बी.जी.शिर्के कंपनीमध्ये शुक्रवार दिनांक ३ जानेवारी रोजी५:३०वाजण्याच्या सुमारास सचिन पाटील,समीर पाटील व नरेश पाटील हे कंपनीच्या आवारात प्रवेश करून कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर उत्तम ज्ञानेश्वर नागटिळक (वय४७) रा.सुकापुर नवीन पनवेल यांना शिवीगाळ व दमदाटी करत जबर मारहाण केल्याने रसायनी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शिर्के कंपनीने २०२४मध्ये अतिरिक्त ११,००० स्केअर फुट चा प्लॉट एमआयडीसी कडून घेतला सदर प्लॉटचे मुळ शेतकरी पाटील यांना कंपनीकडून कामे देण्यात आली आहेत सध्या या जागेवर कंपनीने भराव केला असता तुम्ही भराव करायचा नाही अशी दमदाटी सचिन पाटील, समीर पाटील व नरेश पाटील यांनी करत ४०लाख रुपयांची मागणीही केली  असल्याचेही फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे… शुक्रवार दि.३ जानेवारी रोजी हे तिघेजण कंपनीत गेले असता कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर उत्तम नाग टिळक यांना ऑफिसमधून बाहेर बोलावून दमदाटी व शिवीगाळ करत तुम्ही काम कसे काय चालू केले असा सवाल करत समीर पाटील व नरेश पाटील या दोघांनी तक्रारदार नागटिळक यांचे दोन्ही हात पकडून धक्काबुक्की करत सचीनने त्याच्या हातातील लोखंडी रॉड नागटिळक यांच्या उजव्या दंडावर जोरदार उपट मारून गंभीर दुखापत केली तसेच कंपनीचा कंत्राटी कामगार योगेंद्र कत्रे यास मारहाण केल्या प्रकरणी सचिन पाटील समीर पाटील व नरेश पाटील (राहणार चावणे तालुका पनवेल) या तिघांवर रसायनी पोलीस ठाण्यात ३०८(२),३३३,११८(१),११५(२),३५१(२),३५२,३(५) अन्वये गुन्हा करण्यात आला असून अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव हे करीत आहेत.