खालापूर शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे,अर्जुन कदम):-
खालापुरच्या पाताळगंगा एमआयडीसीतील एसपीआर कंपनीत अचानक आग लागली आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. खोपोली नगरपालिका, पाताळगंगा एमआयडीसी आणि रिलायन्स कंपनी यांच्या फायरब्रिगेड टीम घटनास्थळी पोहोचल्या असून मंडळ अधिकारी खेडकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
खालापूर तालुक्यातील रसायनी औद्योगिक वसाहतीमधील कैरे गावातील SPR फार्मा या कंपनीला आग लागली आहे…आगीने रौद्र रूप धारण केले असून ही कंपनी सिप्ला या कंपनीसमोर आहे…आगीचे कारण अद्याप समजले नाही.अजूनही जिवीतहानी बाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही, पातळगंगा औद्योगिक अग्निशमन दल,खोपोली नगरपालिका अग्निशमन दल आणि स्थानिक कंपनीतील अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत…अद्यापही आगीवर नियंत्रण आले नाही.खालापूर तहसीलदार चव्हाण यांच्या सूचनानुसार नायब तहसीलदार सुधाकर राठोड व मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडेकर घटनास्थळी पोहोचले आहेत.रसायनी पोलीस यांचे पथक पोहचले आहे…आग नियंत्रणात येत नसल्याने खोपोली औद्योगिक वसाहतीमधील अन्य कंपनीतील अग्निशमनदलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत…परिसरात धुराचे लोट पसरले आहे… त्यामुळे त्रास होत आहे.. कॉस्मेटिक तयार करण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल बनविले जाते… आग वाढत चालल्याने jsw कंपनी, पनवेल महानगर पालिका व अन्य अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.कंपनीच्या आवारात असलेले केमिकलने भरलेले ड्रम मॅन्युअली बाजूला घेण्यात येत आहेत.
जेणेकरून पुढील नुकसान टळू शकेल.