धक्कदायक…पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचा राग मनात धरला…राग अनावर झाल्याने मन्सुरी पती-पत्नीला केली अमानुष मारहाण…

0
47

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):- 

रायगड जिल्ह्यातील अलिबाग रेवस रस्त्यावरील सायमन कॉलनी येथे घरावरून चालु असलेल्या न्यायलयीन वादावरून तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचा राग मनात धरून हासिम हुसेन मन्सुरी वय वर्ष (51) व अमिना हाशिम मन्सुरी वय वर्ष (47) यांना सलिम डिगी याने मारहाण करीत गंभीर जखमी केले असल्यायाबाबतची तक्रार हाशिम मन्सूरी यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग तालुक्यातील थळ ग्राम पंचायत हद्दीतील मौजे सायमन कॉलनी येथे  दिनांक 23/12/2024 रोजी दुपारी एकच्या सुमारास मौजे हाशिम मन्सूरी यांच्या  राहत्या घरी सायमन कॉलनी, ता.अलिबाग येथे हाशिम मन्सूरी रा.घर नं.304, सायमन कॉलनी, वायशेत, हे त्याच्या घरी असताना कोणीतरी घराचा दरवाजा ठोठावल्याने तो उघडला असता सलिम डीगी रा. सायमन कॉलनी, वायशेत, याने त्याच्या आईसोबत हाशिम मन्सूरी यांच्या घरावरून चालू असलेल्या न्यायलयीन वादावरून तसेच सलिम डीगी याचे विरूध्द फिर्यादी यांच्या  पत्नीने अलिबाग पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी यांचे डोक्यामध्ये व उजव्या हातावर उपटी मारल्या तसेच हाशिम मन्सूरी उपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल अलिबाग येथे गेल्यानंतर सलिम डीगी याने हासिम हुसेन मन्सुरी यांची पत्नी  अमीना हिच्यावर सुध्दा उजव्या पायावर, डाव्या हातावर व डोक्यावर लोखंडी रॉडने उपटी मारून दुखापत केली…यासाठी अमिना मन्सुरी या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी व आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी निषेध जाहीर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते…हल्लेखोरांना शिक्षा हाच अमिनाचा न्याय…अशा घोषणाबाजी मूकमोर्चा दरम्यान करण्यात आल्या…यावेळी महिला संपर्कप्रमुख संजीवनी नाईक यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी निवेदन दिले… याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम  118(2),118(1),333,352,351(2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सागर राउत करीत आहेत…