रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोह्यातील वरसे गावात ११ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती… या घटनेनंतर सर्वत्र संपताची लाट पसरली आहे… दोषीला कठोर शिक्षा व्हावी, म्हणून ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री रोहा पोलीस ठाण्यात जमा होऊन हल्लाबोल करत संताप व्यक्त केला… याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे… बुधवारी (८ जानेवारी) सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देत घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली… व सदर खटला ट्रॅकवर चालवून आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, असे स्पष्ट मत व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आश्वासित केले… तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक गावात अल्याची माहिती समजताच ग्रामस्थ जमले आणि त्यांनी आरोपींचा एन्काऊंटर करा अशी मागणी करत संताप व्यक्त केला…यानंतर रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देखील पिढीत कुटुंबाची भेट घेतली… रोह्यात अल्पवयीन मुलींबाबत घडलेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो… या घटनेची माहिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे… त्यांनी स्वतः फोन करून घटनेची माहिती घेतली… फास्टट्रॅकवर ही केस घेऊन लवकरात आरोपीला कठोर शिक्षा होईल…असे आश्वासन दिले… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही फोनवरून मी कल्पना दिली आहे….पीडितेच्या कुटुंबीयांसोबत आम्ही सर्वजण आहोत… असा विश्वास भरतशेठनी माध्यमांशी बोलताना दिला…