अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
वाहतूक नियमांची जनजागृति करण्यासाठी आज अलिबागमध्ये परिवहन विभागाकडून रस्ते सुरक्षा अभियान घेण्यात आला… या अभियानात कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता… मागील वर्षभरात 732 अपघात होऊन त्यामध्ये 266 जणांचा मृत्यु झाला होता… ही आकडेवारी कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम उपस्थितांना यावेळी समजवण्यात आले…