रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
बदलापुरातील प्रकरण त्यानंतर मुरुड-रेवदंडा प्रकरणाने देशात संतापाची लाट असतानाच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत…रोहा तालुक्यातील वरसे गावातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली होती…या घटनेनंतर सर्वत्र संपताची लाट पसरली आहे…दोषीला कठोर शिक्षा व्हावी, म्हणून ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री रोहा पोलीस ठाण्यात जमा होऊन हल्लाबोल करत संताप देखील व्यक्त केला…या घटनेचा निषेधार्थ रोह्यात मूक मोर्चा काढण्यात आले… वरसे स्टॉप ते पोलीस स्टेशन असा मुक मोर्चा काढण्यात आला होता…या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते… हातात फलक घेऊन नराधमाला फाशी द्या…अशी घोषणाबाजी करण्यात आली…त्याचबरोबर पोलिसांना व तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन सदर खटला लवकरात लवकर फास्टट्रॅकवर चालवावा व विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी व आरोपीला फाशी मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या…