ट्रॅक्टरची ट्रॉली घसरल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…ट्रॉली नाल्यामध्ये पडल्याने सतीश देशमुख मृत्युमुखी…

0
117

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-

महाड तालुक्यातील वरंध – धरणाची वाडी येथे ट्रॅक्टरचा अपघात होऊन एका 47 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे…सतीश संपत देशमुख राहणार- वरंध असे मृत  झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो स्वतः ट्रॅक्टर चालवीत असल्याची माहिती मिळाली आहे…
काल सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सतीश संपत देशमुख यांच्या मालकीचा ट्रॅक्टर शेतातील सर्व काम आटोपून धरणाची वाडी जवळील रोड वरून येत असताना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली नाल्यामध्ये पडल्यामुळे ट्रॅक्टरचा अपघात झाला…यामध्ये सतीश संपत देशमुख गंभीरित्या जखमी झाले…जखमी सतीश देशमुख यांना महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते…परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले…महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार 106 (1),125(A),125(B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बोटे या गुन्ह्याबाबत अधिक तपास करीत आहेत…