जोगेश्वरी शिवसत्ता टाइम्स (पूनम पाटगावे):-
गोरेगाव :- रिपब्लिकन पक्षाच्या बेमुदत उपोषण आंदोलनाच्या इशाऱ्याने वाहतूक विभागाने कारवाई करत मागण्या केल्या पूर्ण केल्या आहेत. जोगेश्वरी पूर्व पोलीस वाहतूक विभागाने गोरेगाव पूर्व विभागातील मृणालताई गोरे उड्डाणपूल ते नेस्को गॅप मेट्रो स्टेशन खालून जाणारा दुहेरी मार्ग अधिसूचना क्र.१८७/पोउआ/वाहतूक/पश्चिम उपनगरे/तात्पू,अधी/अधीक्षक दिनांक २८/१०/२०२४ अन्वये एकेरी करण्यात आला त्यामूळे कामा इस्टेट, बामनवाडी, नेस्को काॅलनी, जयकोच, रामनगर व लक्ष्मण नगर विभागातील नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकरिता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जोगेश्वरी वाहतूक विभागाला ७ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी निदर्शन व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते व या निवेदनाचा विचार करून तातडीने पावले उचलावीत व नागरीकांना दिलासा देत मागण्याची पूर्तता करण्यात यावी, जेणेकरून नागरीकांना दिलासा मिळेल व या मागण्याचा विचार न झाल्यास या मागण्याच्या पूर्ततेकरीता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बेमुदत उपोषण आंदोलन हब माॅल परीसर गोरेगाव पूर्व येथे सूरू करण्यात येईल, याची नोंद घेवून सहकार्य करावे, अशी विनंती व या आशयाचे लेखी निवेदन तत्कालीन प्रभारी अधिकारी परशूराम कांबळे यांना देण्यात आले होते…
दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी हब माॅल परीसर ऑरेकल कंपनी समोर उद्यान च्या चौकात रिपब्लिकन पक्ष गोरेगाव विधानसभेच्या वतीने बेमुदत उपोषण आंदोलन आयोजित करण्याचा इशारा नाॅर्थ पश्चिम विभागाचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त,नाॅर्थ-पश्चिम वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व जोगेश्वरी वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिल्यानंतर वाहतूक विभागाने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत कारवाईस सूरवात करण्यात आल्याचे नवीन वर्षांत पदार्पणाच्या सुरवातीलाच चार ते पाच जानेवारीपर्यत सर्व मागण्याची पूर्तता करण्याची हमी जोगेश्वरी वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश गिरमे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या महीला आघाडी मूंबई प्रदेश अध्यक्षा उषाताई रामलू,उत्तर-पश्चिम मूंबई जिल्हाध्यक्ष रेश्मा खान, गोरेगाव तालूका अध्यक्ष रमेश पाईकराव व झोपडपट्टी महासंघ गोरेगाव अध्यक्ष व वार्ड क्र. ५६ अध्यक्ष संतोष भोसले यांची संयूक्त बैठक रविवार दि. ६ जानेवारी रोजी घेऊन आश्वासन देण्यात आले व आश्वासनाची मागण्याची पूर्तता झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित आंदोलन स्थगीत करण्यात येईल, अन्यथा नियोजित बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणारच हा इशारा प्रशासनाला देण्यात आलेला होता. याच आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन सर्व मागण्यावरती कारवाई करत पूर्ण करत असल्याचे जाहीर करण्यात आले व रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनात्मक भूमिकेचा विजय झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.