महाराष्ट्र राज्य महसूल खाते काय करते आहे ?…भूमी अभिलेख कार्यालय सापडणार चौकशीच्या भोवऱ्यात… 

0
54

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

सामान्य नागरिकांची कामे हेतूपुरस्सर अडवली जातात, वेळेत होत नाही, अशा असंख्य तक्रारी या आधी दापोली भूमी अभिलेख कार्यालयाबाबत सुरू होत्या. आता दापोलीतील नागरीकांच्या तक्रारीत एका लेखी पत्राची भर पडली असून या कार्यालयातील अधिकारी थेट पैशाची मागणी करतात, अशा आशयाचे पत्र दापोलीतील काही नागरिकांनी महसूल तथा गृहराज्यमंत्री योगेशजी कदम यांना लिहीले आहे. त्यामुळे दापोली भूमी अभिलेख कार्यालय हे निश्चितपणे चौकशीच्या फेऱ्यात येणार अशी सर्वत्र चर्चा आहे दापोलीतील प्रत्येकाच्या मुखी आहे.मोजणीची तारीख लावणे, नकाशा काढणे, मोजणी करणे इत्यादी कामांसाठी चलन भरणे, कजाबची प्रकरणे प्रलंबित ठेवणे इत्यादी कामांसाठी टाळाटाळ केली जात आहे. असे अर्थात नमूद करण्यात आले असून या अर्जात एका अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला आहे.या कार्यालयात अनेकदा इथली कागदपत्रे ही पक्षकार हाताळत असून याबाबत अजूनही कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. मात्र, येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, या बाबतीत लक्ष दिले जाईल अशी माहिती उप-अधिक्षकः संभाजी मोतीबोने भूमी अभिलेख कार्यालय, दापोली यांचेकडून ग्वाही म्हणून मिळाली.