म्हसळा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-
म्हसळा तालुका हिंदू संघटनेच्या वतीने आज म्हसळा शहरात भव्य हिंदू धर्म जागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते…. यावेळी म्हसळा शहरातून धर्म दिंडी काढण्यात आली होती…. या मेळाव्यात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज ह. भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांची विशेष उपस्तिथी होती…. यावेळी दहा हजारहून अधिक हिंदू बांधव या मेळाव्यात सहभागी झाले होते… या मेळाव्याच्या निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता….